अहमदपूर येथे मनसेचे वनीकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन
शेतकऱ्यांची पिकनासाडी करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील सोनखेड,मानखेड,कोपरा,पाटोदा,मांडणी अश्या अनेक गावी शेतकऱ्यांची पिके उध्वस्त करणाऱ्या शेकडो हरणांनी उच्छाद मांडला असून वनीकरण विभाग फक्त नुकसानभरपाई देऊ परंतु हरीण पकडण्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ नाही असे म्हणत वेगवेगळ्या विभागाकडे बोट दाखवत टोलवाटोलवी करत असल्यामुळे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी शेतकऱ्यांसह वनीकरण विभागात ठिय्या घातला व तुम्ही हरणांचा बंदोबस्त करा अन्यथा मला तुमचा मनसे स्टाईल बंदोबस्त करावा लागेल असा सज्जड इशारा दोन्ही वनीकरण विभागांच्या अधिकाऱ्यांना अहमदपूर येथे दिला.तुम्ही खून करणाऱ्याला मोकळे सोडून फक्त बळी व्यक्तीला मावेजा देत आहात याची आपणाला शासन प्रशासन म्हूणून लाज वाटली पाहिजे असे डॉ भिकाणे यांनी सांगत हरणांना पकडून तुम्ही जंगलात सोडत नाहीत तोपर्यंत ते असेच शेतकऱ्यांना छळतील व तद्नंतर तो आत्महत्या करेल नंतर परत तुम्ही प्रशासन म्हणून छाती काढून त्याच्या मरणावत परिवाराला शासनातर्फे तुटपुंजी मदत करणार व ही साखळी चालूच ठेवत शेतकऱ्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंनियांनाही लाचार बनवणार परंतु मूळ आजाराचा इलाज कधीच करणार नाही कारण तुमची धोरणेच शेतकरी उन्नती च्या विरोधात आहेत असेही स्पष्ट शब्दात सुनावले.त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा विषय संबंधित मंत्र्यांना कळूउन हरीने पकडण्यासाठी जास्तीचे मनुष्यबळ व अद्यावत यंत्रणा मागूउन घेऊ असे आश्वासन दिले त्यांनंतर मनसेने आंदोलन संपवले व तात्काळ ह्या गावांना भेटून पंचनामे करा अशी सूचनाही डॉ भिकाणे यांनी अधिकाऱ्यांना केली.यावेळी मनसेचे तालुकाउपाध्यक्ष उत्तम पाटील,प्रसिद्धी प्रमुख अजय तुपकर,ग्रामपंचायत सदस्य संतोष नारागुडे,चेअरमन मदन पलमटे,चंद्रकांत सांगुळे,गजानन पांगरे,सतीश करपुडे,अजय तुपकर,शिवराज कासले,लक्ष्मण भदाडे, बाबुराव लांडगे,व्यनकट गायकवाड,मनोज पाटील,बाबाराव आढाव,व्यनकट कदम,मनोज पाटील,ज्ञानेश्वर तलवार,उद्धव कदम,रितेश आढाव,गोविंद आढाव,उद्धव गायकवाड आदींसह मोठया संख्येने शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.