लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला प्रकाश.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला प्रकाश.

पुण्यतिथीनिमित्त प्रासंगीक लेखन.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उर्फ केशव यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वती बाई तर वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक होते. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात झाले. 
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे बालपणापासून अत्यंत कुशाग्र बुद्धीचे आणि जन्मताह हुशार होते. बालपणापासूनच ते गणित आणि संस्कृत विषयांमध्ये निष्णात असून त्यांचे बी ए चे शिक्षण 1877 साली पूर्ण करून  त्यानंतर त्याने बी एल एल बी कायद्याचे शिक्षण घेतले.
वयाच्या केवळ 23 व्या वर्षी वकील म्हणून ते कामाला लागले. लोकमान्य टिळकांचे शरीर  अत्यंत किरकोळ होते. त्यामुळे त्यांचे मित्र त्यांचे चेष्टा करत असत. सदरची गोष्ट टिळकांच्या मनाला लागली म्हणून त्याने शरीर यस्टी बनवण्यासाठी सर्व अभ्यास बाजूला ठेवून त्याने शरीर सुदृढ करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
  लोकमान्य टिळकांचे कार्य:
लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्यलढ्याचे प्रमुख सेनानी होते देशासाठी त्यांनी तन-मन धनाने देशाची अत्यंत प्रामाणिक पणाने मनोभावे अत्यंत खडतर सेवा केली हे विशेष होय. अमोघवानी ज्वलंत लेखणी आणि अचाट करणी त्यांच्याकडे होती. त्यांच्या राष्ट्रीय व सामाजिक कार्यामुळे जनतेने स्वयंप्रेरणेने त्यांना लोकमान्य पदवी बहाल केली.
 लोकमान्य टिळकांचे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य महान आहे. त्याने सबंध भारतामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची सपना केली. मराठी भाषेतून केसरी आणि मराठा हे वृत्तपत्रा ची पायाभरणी केली. त्यांना 1882 साली डोंगरी येथे एकशे एक दिवसाचा तुरुंगवास भोगावा लागला. म्हणून त्यांना हिंदुस्तानी असंतोषाचे जनक मानले जाते.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या समाजाप्रती असलेल्या कडव्या भक्तीपोटी सर्वसामान्य जनतेच्या मनात निखारे फुलवले, अंगार पेटवला, स्वदेशी राष्ट्र, स्वराष्ट्र, स्वराज्य ब्रिटिशांची झोप उडवली, आपल्या लोकप्रिय असलेल्या दैनिक केसरीतून जहाल आणि परखड लेखनाबद्दल त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरून त्यांना सहा वर्ष काळ्यापाण्याची शिक्षा झाली.
1908 साली त्याना भंडाऱ्याच्या कारागृहात ठेवण्यात आले. तेथे त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. लोक चळवळीसाठी व जनजागृतीसाठी आणि लोकांनी एकत्रित यावे यासाठी 1884 साली पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलीआणि  1885 साली पुण्यातील नामवंत फर्ग्युसन महाविद्यालयाची मुरतमेड रोवली.
 त्यानी महाराष्ट्रात सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केला. देशभक्तीपर गीत, एकांकिका ,नाटक आणि व्याख्यानाच्या माध्यमातून स्वराज्य मिळविण्यासाठी तरुणांच्या मनामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा विशेषत्वाने प्रयत्न केला.
 ब्रिटिश शासनाच्या विरोधात प्रखर बंड करताना ते म्हणाले की, या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असे ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक केसरीच्या माध्यमातून आपले प्रखर विचार मांडत.  त्यांनी स्वराज्याचा मुद्दा कायमस्वरूपी लावून धरला. लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि जनप्रबोधन केले.
 1905 मध्ये वंगभंग आंदोलन लोकमान्य टिळक यांनी केले. 1909 साली त्यांनी स्वराज्य, स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुरसूत्री ब्रिटिश सरकार विरुद्ध मांडली. म्हणून ते सरकार दरबारी जहाल मतवादी नेते म्हणून ओळखले जात.
 लोकमान्य विवेकनिष्ठ व विचारी:
 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे विवेकनिष्ठ विचारी आणि तत्वज्ञ म्हणून सुप्रसिद्ध होते. त्यांनी ओरायन, पंचांग, आर्थिक होम इन वेदाज हा ग्रंथ त्यांनी लिहिला. लाल बाल आणि पाल म्हणून ही त्यांची ओळख आहे. देशातील हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी  त्यांनी लखनौ करार घडवून आणला. नामवंत पत्रकार, जहाल देशभक्त, म्हणून त्यांचा सर्वच क्षेत्रातून गौरव  केला जातो. अशा या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे दि. एक ऑगस्ट 1920 साली सरदार गृह, मुंबई येथे त्याने अखेरचा श्वास घेतला.

रामलिंग बापुराव तत्तापूरे,
उपक्रमशिल शिक्षक तथा मराठी विभाग प्रमुख,
यशवंत विद्यालय अहमदपूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर (महाराष्ट्र)413515
9764330300
🙏

About The Author