लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला प्रकाश.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला प्रकाश.

जयंतीनिमित्त प्रासंगिक लेखन.

 स्वर्गीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मराठी साहित्यातील समाज सुधारक, लोककवी आणि प्रसिद्ध लेखक म्हणून समाजाला त्यांची ओळख आहे.  त्यांचा जन्म वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे झाला. जन्म नाव तुकाराम भाऊराव साठे असे असून त्यांना लाडाने अण्णाभाऊ या टोपण नावाने समाजात ओळख होती. ते निरक्षर होते. शाळेत केवळ दिड दिवस गेले, विद्यार्थी, विद्यार्थ्यांच्यांतील भेदभावामुळे त्यानी कायमची शाळा सोडली. त्यांच्या आईचे नाव बालूबाई, वडिलांचे नाव भाऊराव साठे, पत्नीचे नाव कोंडाबाई आणि जयवंता असे होते. त्यांना मधुकर, शांता आणि शकुंतला अशी तीन आपत्ती होती.
 त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतीशील तेवर  आधारलेले होते. अण्णाभाऊ हे मार्सवादी, आंबेडकरवादी  प्रवर्तीचे होते.  प्रारंभीच्या काळात त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा मोठा पगडा होता.
दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जात असून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडलेली आहे.
साहित्यप्रकार:
शाहीर कथा, कादंबरीकार,  संयुक्त महाराष्ट्र चळवळ, प्रसिद्ध साहित्य कृती- फकीरा, त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे, ज्येष्ठ विचारवंत कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव जाणवत होता.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे म्हणून महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.
आजही त्यांच्या सर्व साहित्यांचा अभ्यास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यी आणि अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले. शाहीर अमर शेख आणि शाहीर द न गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा ,विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र सोबतच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहीर आणि आपल्या लालबावटा कला पथकाचे प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले.
राजकारण:
 अण्णाभाऊ साठे प्रथम कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या समाजवादी श्रेणीच्या विचाराने प्रभावित झाले होते .1944 मध्ये दत्ता गव्हाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्याने लालबावटा पथक स्थापन केले. याद्वारे त्याने अनेक सरकारी निर्णयांना मोठ्या प्रमाणात आवाहन दिले.
 भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्च वर्णीयाचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी 16 अगास्ट1947 रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्चातील घोषणा होती .
हे आजादी झुटी है, देश की जनता भुकी है,
इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन मध्ये ही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होते.
  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीतून ते दलित कार्याकडे वळले आणि दलित व कामगाराच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला गेला.          इसवी सन 1958  मुंबईमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात ते म्हणाले की पृथ्वीही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली आहे असे सांगून त्यानी जागतिक संरचना मध्ये दलित आणि कामगार वर्गाचे महत्त्व ठणकावून सांगितले.
 लेखन साहित्य:
 अण्णाभाऊ साठे आणि मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या त्यामध्ये फकीरा 1959 तिला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
लघुकथा संग्रह 15 आहेत. त्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि 27 भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत.
कादंबऱ्या आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त अण्णाभाऊ साठे यांनी नाटक रशियातील भ्रमंती, बारा पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील दहा गाणी लिहिले आहेत. मुंबईमधील शहरी पर्यावरण आणि त्यांच्या लिखाणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. तो त्यांनी डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला. त्यांनी त्यांच्या मुंबईच्या लावण्या आणि मुंबईच्या गिरणी कामगार या दोन गाण्यातून मुंबईला दूर व्यवहारी शोषणकारी असमान आणि अन्याय पूर्ण असा त्यांनी उल्लेख केला आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रकाशित पुस्तके:
1)अकलेची गोष्ट(लोकनाट्य 1945)
2) अण्णाभाऊ साठे: प्रातिनिधी कथा (संपादक डॉ. एस
एम भोसले.)
3) अमृत
4) आघात
5) आबी (कथा संग्रह)
6) आवडी (कादंबरी)
7) इनामदार (नाटक 1958)
8) कापऱ्या चोर (लोकनाट्य)
9) कृष्णाकाठच्या कथा (कथा संग्रह)
10) फुलवाडा (कथासंग्रह)
11) गजाआड (कथासंग्रह)
12) गुर् हाळ
13) गुलामी (कादंबरी)
14) चंदन (कादंबरी)
15) चिखलातील कमळ (कादंबरी)
16) चित्रा (कादंबरी)
17) शिरा नगरची भूत (कथासंग्रह 1978)
18) नवती (कथा संग्रह)
19) निटवारा (कथासंग्रह)
20) जिवंत (काढतूस कथासंग्रह)
21) तारा
22) देशभक्त घोटाळे (लोकनाट्य 1946)
23) पाझर (कादंबरी)
24) पिसाळलेला माणूस (कथासंग्रह)
25) पुढारी मिळाला (लोकनाट्य १९५२)
26) पेंग्याचे लगीन (नाटक)
27) फकीरा कादंबरी १९५९
28) फरारी (कथासंग्रह १९५९)
29) मधुरा (कादंबरी)
30) माकडीचा माळ (कादंबरी १९६३)
31) रत्ना (कादंबरी)
32) रानगंगा (कादंबरी)
33) रूपा (कादंबरी)
34) बरबाद्या कंजारी (कथासंग्रह १९६०)
35) बेकायदेशीर (लोकनाट्य 1947)
36) माझी मुंबई (लोकनाट्य)
37) मूक मिरवणूक (लोकनाट्य)
38) रानबोका
39) लोक मंत्राचा दौरा (लोकनाट्य 1952)
40) वारणेचा वाघ (कादंबरी 1968)
41) वैजयंता (कादंबरी)
42) वैर (कादंबरी)
शेटजीचे इलेक्शन 43)(लोकनाट्य 1946)
संघर्ष
1) सुगंधा
2) सुलतान (नाटक)
प्रवास वर्णन
1)कविता आणि माझा रशियाचा प्रवास
काव्ये: अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या,
अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनावर आधारित चित्रपट आणि कादंबऱ्या खालील प्रमाणे:
वैजयंता 1961 कादंबरी -वैजयंता
टिळा लावते मी रक्ताचा (1969 कादंबरी आवडी)
डोंगराची मैना (1969 कादंबरी माकडीचा माळ)
मुरली मल्हारी रायाची (1969 कादंबरी चिखलातील कमळ)
वारणेचा वाघ 1970 कादंबरी (वारणेचा वाघ)
अशी ही साताऱ्याची तरह (1974 कादंबरी अलगुज)
फकीरा (कादंबरी फकीरा)
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुठल्याही शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण न घेता केवळ घेतलेल्या अनुभवातून, सोसलेल्या वेदनेतून, आणि त्यांच्या लाभलेल्या प्रतिभेतून,त्यांनी मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव त्यांनी कोरलेलं आहे.
यांचा आदर्श आपल्या तरुणांनी घेऊन आपलं जीवन सुसंस्कारित करावे. हाच काहीसा पुण्यतिथीच्या निमित्ताने हेतू म्हणून लेखन प्रपंच केले
ला आहे.
रामलिंग बापूराव तत्तापुरे,
उपक्रमशिल शिक्षक तथा मराठी विभाग प्रमुख,
यशवंत विद्यालय, अहमदपूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर (महाराष्ट्र)413515
9764330300

About The Author