नोकरी कडून व्यवसायाकडे भगवान कदम यांचे दमदार पाऊल – प्रा.मारोती बुद्रुक पाटील

नोकरी कडून व्यवसायाकडे भगवान कदम यांचे दमदार पाऊल - प्रा.मारोती बुद्रुक पाटील

उद्योग व्यवसाय कडे वाटचाल म्हणजे आत्मनिर्भर्तेकडे सक्षम पाऊल होय व्यवसायामुळे स्वतःला आणि इतरांनाही रोजगार मिळतो उद्योग व्यवसायाची वाढ म्हणजे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक ठरते.आमचे भाचे भगवान कोंडीबा कदम खोरसकर यांनी नोकरी सोडून व्यवसायाकडे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. या त्याच्या प्रयत्नाला नक्की यश मिळावं कारण कुठलाही व्यवसाय वाईट नसतो परंतु ते व्यवसायातून समाजाला समृद्ध करण्याचं ध्येय मात्र ध्येय वेड्या माणसाकडे असले पाहिजे
सध्या लोकांना फक्त नोकरी पाहिजे व्यवसाय नको व्यवसायामध्ये रिस्क असते परंतु जेवढे रिस्क असते तेवढा फायदा पण जास्त असतो सध्या स्पर्धेचं युग आहे.युवक वर्ग हा नोकरीच्या मागे लागला आहे त्यांनी शासनाच्या शासकीय नवनवीन योजनांचा फायदा घेऊन नवीन उधोग व व्यवसाय सुरू केला पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते राज्य छोटं असलं तरी चालेल पण ते स्वतःचच असलं पाहिजे कदाचित याच इतिहासाची सांगड घालून आमचे भाचे भगवान कदम यांनी आपला मोर्चा व्यवसायाकडे वळवलाय मुळात लहानपणापासूनच त्याला हॉटेलिंग व्यवसाय करण्याची आवड होती परंतु आई-वडिलांच्या आग्रहास्तव त्याला नोकरी करावी लागली.
परंतु नोकरीत त्याचे मन लागत नव्हते त्याच्या मनात कायम धग होती.
शेवटी त्याने आपल्या माणसांच्या सहवासात यावे म्हणून सोलापूर जिल्ह्यातून बार्शी कडून आपल्या जिल्ह्यात गंगाखेड येथे मोर्चा वळवला.
बालपणापासून बार्शी येथेच राहिल्याने ते गांव सोडताना त्याच्या मनात किती कासावीस झाले असेल याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. काळजावर दगड ठेवला असेल तिथल्या मातीला आई-वडिलांना भावांना सलाम करताना भगवान कदम यांच्या आयुष्यात दुःखाचे दोन प्रसंग येऊन गेले त्यातूनही तो सावरत तो खचला नाही हारला नाही तेवढ्याच जिद्दीने तो पेटून उठला.
शेवटी एक मनात हे ठेवून त्यांनी आपल्या गावाकडे यायचं ठरवल आपल्या कुटुंब कबिल्यासह त्यांनी स्वतःला आत्मसात करण्याच धाडस निर्माण केल आहे. भगवान कदम यांच्या धर्मपत्नी वैष्णवी हिने भगवान कदम ला भक्कमपणे साथ देत मी तुमच्या पाठीमागे खंबीर उभे आहे असं म्हणून तिनेही त्याला या हॉटेलिंग व्यवसायामध्ये सहकार्य करायचे ठरविले नाही तर बऱ्याचदा पत्नी एकीकडे आणि पती दुसरीकडे दोघांचा एकमेकाला वेळ नाही असं घडलं तर कुठल्याही व्यवसायामध्ये कोणाचही मन लागत नाही परंतु दोघांशी मन जुळली आणि व्यवसायात उडी घेतली मेहनत जिद्द आणि चिकाटी असली की पती-पत्नीच्या संसाराला भर यायला वेळ लागत नाही एखादी स्त्री घराला नंदनवन करू शकते तर एखादी स्त्री त्या घराचं समशान उभा करू शकते शेवटी स्त्री ही मातृत्वाचे रूप आहे दुर्गा महिषासुर मर्दिनी स्वरूप आहे म्हणून स्त्रीने आपल्या स्वतःच्या पतीला सुखात आणि दुःखात खंबीरपणे पाठीमागे उभे राहण्यासाठी तिने नेहमी प्रयत्न केला पाहिजे तो वैष्णवी हिने नक्की केलेला दिसतो आई कमलबाई व वडील कोंडीबा कदम हे नेहमीच आपल्या लेकरा बाळांना कष्टातून शिकविण्याचा त्यांनी प्रयत्न केला पालम तालुक्यातील कोरस गाव सोडून ते बार्शी या ठिकाणी गेल्या अनेक दशकापासून राहतात भाऊ अमोल व अमोलच्या धर्मपत्नी प्रियंका कदम आणि बहिण सारिका जाधव या सर्वांना सांभाळताना आई-वडिलांना तारेवरची कसरत करावी लागली होती मुलं मोठी व्हावी हेच त्यांच मोठ स्वप्न होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी भगवान कदम यांनी सुरू केलेल्या व्यवसाय हा निश्चितच या कुटुंबासाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.
या धाडसाचे काही लोक कौतुक तर करतायेत परंतु काही माणसांना अयोग्यही वाटत आहे.
ते काही असो प्रगती झाली की माणसे सगळी आपली होतात मग तो व्यवसाय कुठला आहे याचा कोणी विचार करत नाही आपल्याकडे गाडी बंगला कार आणि चार पैसे जवळ झाले की सगळेजण सलाम करतात हा नीतीचा नियम आहे आपलं भलं झालं की सगळे पाहुणे जवळची माणसे त्याच्यावर खूप मायेचा पांघरून घालतात पण एकदा काही वाईट झालं की आपल्या जवळ कोणी उभे राहत नाही परंतु कधीकधी बुडत्याला काडीचा आधार म्हटल्यासारखं एखाद्याला उभं करण्यात काही वावग नसत. आपल्याला काही करता येत नसेल तर आपण दुसऱ्याला हरवू नये त्याच्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जा निर्माण करू नये तू करू शकतोस तुझे तुझ्या हातात आहे तू मेहनत कर 100% तुम्हाला यश मिळेल एवढं जरी कोणी पाठीवर हात फिरवत म्हटलं तरी तो जिद्दीने पेटून उठतो.
भगवान कदम यांना लेडीज एम्पोरीमध्ये व्यवसाय करण्यासाठी मी प्रवर्त केले परंतु त्याला मात्र गुडलक चायनीज सेंटर निर्माण करावे ही त्याची मनोमनी इच्छा असते ती माणसाच्या हृदयातून बाहेर पडते. त्याच्यातच माणूस करिअर करून मोठा होतो हेही सत्य आहे आणि ते भगवान च्या बाबतीत सत्य ठरले आज त्याची सत्वपरीक्षा नक्की असणार आहे नवीन तालुका नवीन माणसे नवीन गाव हा व्यवसाय त्याला उभा करताना तारेवरची कसरत नक्की करावी लागेल परंतु ध्येय सिद्धीकडे जात असताना वाटेत अनेक डोंगर पर्वत नदी नाले लागतील तेवढी पार करण्याची हिंमत मात्र मनात असली पाहिजे
हिम्मत मत खोना बहुत आगे जाना है,
जिसने कहा था तेरे बस का नहीं
उन्हें करके दिखाना है।
जो हिम्मत करते हैं कुछ कर दिखाने की
वही कामियाबी की दौड़ में कुछ कर गुज़रते हैं।
मुश्किलें जिन्दगी में सबको करती है तंग,
जीत जाते है वो जो हिम्मत रखते है संग.
कामयाबी के दरवाजे उन्हीं के
लिए खुलते हैं जो उन्हें
खटखटाने की हिम्मत रखते हैं।
मैंने अपने अंदर खुदा को महसूस किया,
जब मैं हारा हूँ तब उसने हिम्मत दिया।
उम्मीदों की कश्ती को ङुबोया नहीं करते,
मंज़िल दूर हो तो थक कर रोया नहीं करते,
रखते हैं जो दिल में उम्मीद कुछ पाने की,
वो लोग ज़िंदगी में कुछ खोया नहीं करते.
माँ-बाप का आशीर्वाद जब साथ है,
तो जिन्दगी के मुश्किलों की क्या औकात है.
अशा हिमतीने भगवान कदम आता तो आपल्या व्यवसायामध्ये आपलं करिअर करण्यासाठी पुढे जातो आहे कुठलाही व्यवसाय उभा करताना क्वालिटी क्वांटिटी आणि माफक दर दिला की ग्राहकांची गर्दी होते याचं गमकही त्याला माहित आहे दर दिवसाला एक हजार रुपये खवयाला देऊन त्याच्याकडून क्वालिटीचेच चायनीज तयार करून घेण्याचे ठरवल्याने आता ग्राहकांची गर्दी ही वाढते आहे भगवान कदम यांचा व्यवसाय असाच भरभराटीला जावा आणि तो एका मोठ्या हॉटेलचा मालक होईल यात शंका नाही एक कहानी अशीच होती एका व्यक्तीने एक चहाची टपरी टाकली छोटस हॉटेल आणि त्या व्यक्तीचे आज अनेक देशांमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल आहेत सुरुवात कुठली अशीच असते एकदा हिमतीने हिमालयाची उंची गाठायची ठरली की त्याला यश मात्र आपोआपच मिळते फक्त गरज असते त्याच्या मेहनतीची आपण अशीच प्रगती करावी म्हणून भगवान कदम यांचा काल भर आहेरासह शाल पुष्पगुच्छ देऊन फेटा बांधून आमच्या परिवाराच्या वतीने सन्मान केला आणि त्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तुझाच मामा

प्रा.मारोती बुद्रुक पाटील
संचालक
दिपज्योती पब्लिसिटी अहमदपूर.
मो.914611111.
914675111.

About The Author