अहमदपूर बसस्थानकातील घाणी विरोधात मनसेचा एल्गार

अहमदपूर बसस्थानकातील घाणी विरोधात मनसेचा एल्गार

मनसेने उपरोधिक पणे घातला घाणीला हार.

अहमदपूर ( गोविंद काळे ) शहराच्या बसस्थानकातील घाणीमुळे आणि तेथे पसरलेल्या दुर्गंधीने शहराच्या मुख्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे बस डेपो प्रशासनाने हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अन्यथा जिम्मेदार अधिकाऱ्याला याच घाणीमध्ये बसवण्याचा निर्वानिचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी दिला आहे.त्यानंतर मनसेने घोषणाबाजी करत खड्ड्याला उपरोधिकपणे फुलांचा हार घातला
शहरातील बस डेपो येथील घाणीची दुर्गंधी सर्वदूर पसरत असून जनता,व्यापारी,ग्राहक,विद्यार्थी, वृद्ध त्रस्त झाले आहेत व त्यांना महामारीला तोंड द्यावे लागत आहे. तरीही बस प्रशासनाला अजीबात जाग येत नाही. याचा निषेध जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी नोंदवत येथे घोषणा बाजी करीत आंदोलन केले.या घाणीमुळे डुकरांचा प्रादुर्भाव वाढलेला असून या परिसरातील दुकानदार,ग्राहक,विद्यार्थी, महीला यांना चक्क नाकाला रुमाल लावून फिरण्याची वेळ आली आहे.
पुढे बोलताना त्यांनी बस प्रशासनाने संरक्षण भिंत,तारेचे कुंपण व मजबुतीकरण करून स्वछता कर्मचाऱ्यांकडून दररोज स्वच्छता ठेवण्याविषयीचा प्रेमाचा सल्ला ही दिला आहे.ज्यामुळे चौकात वावरणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात न येता छत्रपती शिवाजी चौकाची व अहमदपूर ची प्रतिष्ठा राहील असे येथील अधिकारी यांनी वागले पाहिजे असे यावेळी सांगितले. या घाणीच्या भागात मुरूम टाकून तेथे मजबुतीकरण केल्यास लोकांचे आरोग्य बिघडणार नाही याची काळजी अधिकारी यांनी घ्यावी. याच ठिकाणी उदगीर कडे जाणाऱ्या बसचा थांबा आहे. याचा गरीब प्रवाशांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आलेली आहे. या भागाची स्वच्छता करण्याची मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाने यांनी केली.
याप्रसंगी नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक सतीश बिल्लापट्टे,बसस्थानक प्रशासनाचे कोकाटे,मनसेचे तालुका उपाध्यक्ष उत्तम पाटील,प्रसिद्धी प्रमुख अजय तुपकर,ग्रामपंचायत सदस्य संतोष नारागुडे,चेअरमन मदन पलमटे,चंद्रकांत सांगुळे,गजानन पांगरे,सतीश करपुडे,अजय तुपकर,शिवराज कासले,लक्ष्मण भदाडे, बाबुराव लांडगे,व्यंकट गायकवाड,मनोज पाटील,बाबाराव आढाव,व्यनकट कदम,मनोज पाटील,ज्ञानेश्वर तलवारे,उद्धव कदम,रितेश आढाव,गोविंद आढाव,उद्धव गायकवाड आदींसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author