आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
लातूर (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या नगर विकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रेणापूर नगरपंचायत अंतर्गत मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना बांधकाम करणे आणि बालाजी मंदिर येथे सभागृह बांधकाम करणे यासह विविध विकास कामासाठी भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदरील निधी मंजूर झाल्याबद्दल आ. कराड यांचे रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले आहेत.
रेणापूर नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर राज्य शासनाच्या नगर विकास विभागाअंतर्गत भाजपा नेते आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून नगरपंचायत इमारत बांधकाम, पाणीपुरवठा योजना, अंतर्गत सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, अग्निशामन इमारत व वाहन यासह विविध विकास कामासाठी आजपर्यंत कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध झाला असून त्यातील काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.
रेणापूर येथील मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना बांधकाम व्हावे आणि बालाजी मंदिर येथील विविध शुभकार्यासाठी लागणारे भव्य सर्व सोयींनी युक्त सभागृह व्हावे अशी अनेक दिवसांची मागणी होती. या दोन्ही कामासाठी अनेक वेळा अनेक पुढाऱ्यांनी आश्वासने दिली मात्र प्रत्यक्षात कृती कोणीच केली नाही. याकामासह रेणापूर शहरातील विविध विकास कामांना वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेअंतर्गत निधी मिळावा याकरिता भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी पाठपुरावा केला. आ कराड यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या नगर विकास विभागकडून ३१ जुलै २०२३ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना बांधकाम आणि बालाजी मंदिर येथे सभागृह बांधकाम व इतर विकास कामासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
नगर विकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मुस्लिम बांधवासाठी शादीखाना बांधकाम करणे दोन कोटी, बालाजी मंदिर येथे सभागृह बांधकामासाठी एक कोटी रुपये, प्रभाग १४ – रूपचंद नगर येथे स्मशानभूमी शेड बांधकाम व सुशोभीकरण वीस लक्ष रुपये, प्रभाग १२ – खंडोबा मंदिर सभागृह बांधकाम करणे दहा लाख रुपये, पाणीपुरवठा योजनेच्या स्वयं हिस्सा भरण्याकरिता चाळीस लक्ष रुपये, प्रभाग १ – बंडू पतंगे ते राघू काळे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता आणि नाली बांधकाम करणे वीस लक्ष रुपये, प्रभाग ८ – बापू गिरी ते बापू हाके यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे वीस लक्ष रुपये, प्रभाग १० – पंडित माने यांचे घर ते अंगणवाडी पर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकाम करणे वीस लक्ष रुपये, प्रभाग १२ – बसवेश्वर चौक ते खंडोबा मंदिर पर्यंत सिमेंट रस्ता आणि नाली बांधकाम करणे पन्नास लक्ष रुपये, प्रभाग २ – हनुमंतवाडी पाटी वस्ती येथे सिमेंट रोड व नाली बांधकाम करणे वीस लक्ष रुपये असे एकूण पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.
रेणापूर नगरपंचायत अंतर्गत विकास कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गिरीशजी महाजन साहेब यांचे तसेच सदरील निधी मिळावा यासाठी वेळोवेळी प्रयत्न केल्याबद्दल भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांचे रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, माजी नगराध्यक्षा आरती राठोड, विजय चव्हाण, श्रीकृष्ण मोटेगावकर, चंद्रकांत कातळे, उत्तम चव्हाण, दत्ता सरवदे, उज्वल कांबळे, अंतराम चव्हाण, राजू आलापुरे, हणमंत भालेराव, लखन आवळे, आजिम शेख, गणेश चव्हाण, मारूफ आत्तार, अच्युत कातळे, महादू राठोड, नितीन आढळकर, राजू धर्माधिकारी, महेश गाडे, मकसूद शेख, जगन्नाथ कातळे, सचिन सिरसकर, रमेश चव्हाण, योगेश राठोड, संतोष राठोड, शरद चक्रे, हरिभाऊ पांचाळ, धम्मानंद घोडके, उमाकांत कांबळे, गणेश माळेगावकर, रमेश वरवटे, सुरज फुलारी, रफिक कुरेशी, पप्पू कूडके, सोपान सातपुते, रफिक शिकलकर , आवेज कुरेशी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले.