साहित्य म्हणजे आयुष्य जगण्याचा मार्ग – अनिता येलमटे

साहित्य म्हणजे आयुष्य जगण्याचा मार्ग - अनिता येलमटे

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठी वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कथाकार अनिता येलमटे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी ‘काकण चोळी’ ही कथा विद्यार्थ्यांना सांगितली. मराठी वाङ्‌मय मंडळातील बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. मराठी वाङ्मय मंडळाच्या अध्यक्षा म्हणून कु . शुभांगी भालेराव यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.सुधाकर पाटील यांनी मराठी भाषा आपल्याला आई आणि मित्रासारखी जवळची वाटते, असे सांगून मराठी अभ्यास मंडळास शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय समारोपात बोलताना मस्के म्हणाले की,  साहित्य आणि आयुष्याची सांगड व्यक्तिला यशस्वी करते,  तर मराठी विभाग विद्यार्थ्यांना बोलतं आणि लिहत करत आहे असे संगितले.  प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.डॉ.दीपक चिद्दरवार, लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा.डॉ.गौरव जेवळीकर, ग्रंथपाल डॉ.लक्ष्मीकांत पेन्सलवार, प्रा.डॉ.भदाडे, हिंदी विभागातील प्रा.डॉ.काळे, प्रा.डॉ.चन्नाळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अर्चना मोरे यांनी केले, तर आभार प्रा.डॉ.बाळासाहेब दहिफळे यांनी मानले.

About The Author