डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी प्राथमिक विद्यालयात आगष्ट क्रांती दिन साजरा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी प्राथमिक विद्यालयात आगष्ट क्रांती दिन साजरा

उदगीर (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी प्राथमिक विद्यालयात भारत मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीचे सचिव .देविदासराव नादरगे यांच्या अध्यक्षतेखाली ऑगष्ट क्रांती दिन साजरा करण्यात आला.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विश्वनाथराव मुडपे गुरुजी, शाळेचे मुख्याधापक उमेश नादरगे, शरदचंद्र पांचाळ ई.उपस्थित होते.विश्वनाथ मुडपे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील देशभक्तांच्या कामगिरीचा गौरवपुर्ण उल्लेख केला. तसेच अध्यक्षीय समारोप करताना देविदास नादरगे म्हणाले की,देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारक फासावर गेले. कित्येकांनी तुरुंगवास भोगला,सामान्य जनता ही ऑगष्ट क्रांती दिनापासून रसत्यावर येऊन आंदोलन करू लागली असे सांगितले.

सुत्रसंचालन लक्ष्मण गायकवाड यांनी केले तर आभार विजयकुमार पवार यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी आमोल कांबळे,राजकुमार नरहारे यांनी परिश्रम घेतले.

About The Author