अहमदपूर तालुक्यातील कुमठा शिवार हरणांनी केला फस्त
मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी केली बांधावर जाऊन पाहणी
अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील कुमठा,सय्यदपूर शिवारातील शेतकऱ्यांनी मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांना फोन करून हरणांनी पिके फस्त केल्यामुळे त्रस्त झाल्याची फिर्याद केली.याची दखल घेत डॉ भिकाणे यांनी त्या शिवाराला भेट देत त्या चार पाच किलोमीटरच्या परिसरातील शिवाराची फिरून प्रत्यक्ष पाहणी केली.शेतकऱ्यांची पिके हरणांच्या झुंडींनी पूर्णतः नासधूस केल्यामुळे शेतकरी हतबल झालेला त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी तात्काळ वनीकरण अधिकाऱ्याला या भागातील शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करून घ्या व तात्काळ पंचनामे करा असे सांगितले.शेतकऱ्यांना मी नुकसानभरपाई मिळूऊन देतो असेही डॉ भिकाणे यांनी आश्वस्त करत धीर सोडू नका असे भावनिक आवाहनही केले.”या हरिणांचे काय करावे”या मोरतळे या शेतकऱ्याच्या प्रश्नावर डॉ भिकाणे यांनी मी आजच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना बोलणार असल्याचे सांगत शासन जर यावर तोडगा काढणार नसेल तर या प्रश्नाचा आवाज महाराष्ट्रभर बुलंद करून तो शासनाच्या ऐरणीवर आणण्यासाठी वनीकरण कार्यालयात खळखट्टयाक आंदोलन करावे लागेल असे सांगितले.डॉ भिकाणे यांनी स्वतः कुमठा शिवारात फिरून पिकांची पाहणी बांधावर जाऊन केल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी मनसे चे लातूर जिल्हासंघटक डॉ यश भिकाणे,प्रसिद्धिप्रमुख अजय तुपकर,तुकाराम मोरतळे,बाबुराव पाटील,ज्ञानोबा मोरतळे,आबासाहेब पाटील,तुकाराम मोरतळे,ज्ञानोबा तोगरे आदी शेतकरी उपस्थित होते.