परचंडा गाव लातुर जिल्हयात प्रथम १५ ऑगस्टला होणार सन्मान ;३० लाखाचे पारितोषिक जाहीर
अहमदपूर ( गोविंद काळे ) आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना २०२१-२२ अंतर्गत जिल्हातील सुंदर गावाची निवड नुकतीच करण्यात आली जिल्हा सुंदर गावचे प्रथम पारितोषिक अहमदपूर तालुक्यातील परचंडा या गावाला देण्यात आले पारितोषिका पोटी या गावाला तालुकास्तरावरचे १० लाख व जिल्हास्तरावरचे २० लाख रु पारितोषिक जाहीर करण्यात आले. हे पारितोषिक १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी या गावच्या सरपंचाचा सत्कार करुन दिला जाणार आहे.
आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना २०२१-२२ अंतर्गत तालुकास्तरावर १० गावांची निवड करण्यात आली होती या १० तालुक्यातील १० गावातुन परंचडा या गावाची जिल्हातून पहिला म्हणुन निवड करण्यात आली १४ जुलै रोजी सायं. ५ वा. या ग्रामपंचायतीला निवड पत्र देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनवजी गोयल उपायुक्त कार्यकारी अधिकारी गिरी , बोंबले , पोतदार यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला.परचंडा या गावच्या सरपंच सौ. शिवनंदा राजेंद्र हिप्परगे यांची गावच्या विकासात महत्वाची भुमिका राहीले आहे. श व्ही. एस. येलगट्टे ग्रामसेवक म्हणुन काम पाहत आहे.
पारितोषिकाची रक्कम दयावी अशी मागणी करणारे पत्र लातुर जिल्हा परिषदेने १० जुलै रोजी राज्य शासनाला दिले आहे. ही रक्कम प्राप्त झाल्यानंतर येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी संबंधीत गावच्या सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्याला बोलावुन सत्कार करुन ती धनादेशाद्वारे दिली जाणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांनी दिली. आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेत पहिला आणण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवार व विस्तार अधिकारी केंद्रे , पट्टेवाड , सुळे तसेच इतर अधिकारी व कर्मचा-यांनी मार्गदर्शन केले. त्याबद्दल गावच्या सरपंच सौ. शिवनंदा राजेंद्र हिप्परगे व उपसरपंच कुशावर्ता कदम तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी आभार व्यक्त केले आहेत
परचंडा गावाने ग्रामपंचायत अभिलेखे, पारदर्शकता, बायोगॅस निर्मिती, CCTV, सामूहिक राष्ट्रगीत साठी साउंड सिस्टीम, अवजार बँक, बंदीस्त नाली सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन इ. बाबतीत उत्कृष्ट काम केले आहे.
– अमोलकुमार आंदेलवार गटविकास अधिकारी, पं. स. अहमदपूर