भारतीय स्वातंत्र्य दिन श्यामलाल हायस्कूलमध्ये उत्साहात साजरा
उदगीर(एल.पी.उगीले) : श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी बोडके अमन, बिरादार साइविश्व, अवधूत बिरादार या विद्यार्थ्यांनी आजादी का अमृत महोत्सव व स्वातंत्र्य दिनाबद्दल प्रभावी रीत्या भाषण करून सर्वांचे मने जिंकली. त्याबद्दल ध्वजारोहणासाठी उपस्थित मान्यवरांनी व संस्था अध्यक्ष सुपोषपाणि आर्य यांनी रोख पारितोषिक देऊन त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध देशभक्तीपर नृत्य,गीतांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी प्रभावीरीत्या केले. त्याबद्दल यात सहभागी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य, शालेय समिती सदस्य पंडितराव सुकनिकर, डॉ. बाळासाहेब पाटील, माजी उपमुख्याध्यापक भागवत घोळवे,माजी सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनिल बागडे,सह शिक्षक कदम गोविंद यांनी रोख पारितोषिक देऊन अभिनंदन व कौतुक केले. सोलापूर येथे शालेय विद्यार्थ्यांचा एन. सी.सी. कॅम्प संपन्न झाला त्यात सोलापुरे रुद्र संतोष हा विद्यार्थी फायरिंग मध्ये प्रथम आला, त्यासाठी या विद्यार्थ्यास मेडल व प्रमाणपत्र देऊन संस्थाध्यक्ष ऍड.सुपोषपाणि आर्य, शालेय समिती सदस्य पंडितराव सुकनिकर, संस्था सदस्य पी.जी.पाटील, बालरोग तज्ञ डॉ. बाळासाहेब पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला.
श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय ऍड. सुपोषपाणि आर्य यांनी स्वातंत्र्य दिनाच्या व आजादी का अमृत महोत्सव समारोप वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या शूरवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले, देशभक्ताच्या असीम त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. हे स्वातंत्र्य, भारताची समृद्धता अधिकाधिक वाढावी, देशाचा अधिकाधिक विकास व्हावा. यासाठी देशातील प्रत्येक नागरिकांनी समर्पण भावनेने कार्य केले पाहिजे, “देशाची आन-बान -शान हे खरे विद्यार्थी, तरुण पिढी, देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावत असलेले वीर जवान, देशाच्या प्रत्येक क्षेत्रात देशाच्या, समाजाच्या, मातृभूमीच्या समृद्धीसाठी उत्कृष्ट कार्य करणारे सर्व वयोगटातील नागरिक, शेतकरी हेच खरे देशाची आन -बान -शान आहेत. या सर्वांचा सार्थ आभिमान भारतीय म्हणून सर्वांना असावा” असा संदेश याप्रसंगी दिला.
कार्यक्रमास उपस्थित बालरोग तज्ञ डॉ. बाळासाहेब पाटील यांनीही सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आपले स्वातंत्र्य असेच कायम अबाधित राहील यासाठी देशातील प्रत्येक नागरिकांनी देश हिताचे कार्य करावे, देशाच्या विकासासाठी समर्पण भावनेतून आपले कर्तव्य करावे, देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व शूरवीरांचे सदैव स्मरण असावे. असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत सूर्यवंशी यांनी केले तर आभार खंदारे भारत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आनंद चोबळे, प्र. उप मुख्याध्यापक बालाजी चव्हाण प्र. पर्यवेक्षक राहुल लिमये यांच्या मार्गदर्शनानुसार कावरे प्रमोद, कदम गोविंद, सतिष बिरादार, तिवारी सचिन, नादरगे राहूल, हके नामदेव, पुल्लागोर सुनिल, बोळेगावे दिनेश, एन.सी.सी. ऑफिसर सोनाळे बालाजी, एन.सी.सी.विद्यार्थी समूह, प्रा. प्रशांत पाटील, प्रा. संग्राम घोगरे, प्रा. सगर संतोष, रांगोळी व सजावटीसाठी एतनबोने शिलन,रणमले सरशा,रोडगे शैलजा, जेठुरे शीतल, जाधव धनश्री, सलाउद्दीन शेख, बस्वराज स्वामी इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले. त्याचबरोबर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले.