लालबहादूर शास्त्री विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित केंद्रीय कार्यकारी सदस्य तथा संकुलाचे कार्यवाह शंकरराव लासुने, डॉ.संजय कुलकर्णी , भगवानराव गंगनबिडकर, गोविंद जामखंडे ,सतीश पाटील, परमानंद निलंगे ,मोहिनी आचवले,शारदा जाधव तसेच शाळेचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी ,पर्यवेक्षक कृष्णा मारावार, लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले उपस्थित होते.
मुख्याध्यापक अंबादासराव गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसी विभागातर्फे मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. विषय मांडणी संदीप चाटे यांनी केली. भारताचा रक्तरंजीत इतिहास त्यासाठी अनेकांनी केलेले समर्पण,त्याग याविषयीची गाथा विद्यार्थ्यांना सांगितली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. तसेच एनसीसी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन कौतुक करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात डॉ. संजय कुलकर्णी यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन आशा गौतम,प्रास्ताविक नीता मोरे,स्वागत परिचय विजया गोविंदवाड, आभार माधव मठवाले यांनी केले.निवृत्त शिक्षक गोपाळराव जोशी यांची ही उपस्थिती लाभली. सामूहिक पद्य प्रीती शेंडे व संगीत संच यांनी सादर केले.वैयक्तिक गीत ऋतुजा पांचाळ या मुलीने गायले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभ्यास पूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार, मीनाक्षी कस्तुरे ,संतोष कोले, विष्णू तेलंग ,गुरुदत्त महामुनी यांचे सहकार्य लाभले.तसेच या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.