मशाल रँलीच्या घोषणांनी दुमदुमली नगरी, अखंड भारत संकल्प दिन साजरा

मशाल रँलीच्या घोषणांनी दुमदुमली नगरी, अखंड भारत संकल्प दिन साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात अखंड भारत दिनानिमित्त मशाल रॅली काढण्यात आली.अखंड भारत मातेच्या पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मंचावर उपस्थित केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा संकुलाचे कार्यवाह शंकरराव लासुने, प्रशालेचे मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, पर्यवेक्षक कृष्णा मारावार ,लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले उपस्थित होते.
“अखंड भारत, समर्थ भारत” ही घोषणा देऊन अखंड भारत ही संकल्पना राजेश गौतम यांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट केली. देश स्वतंत्र होण्यापूर्वीचा भारत स्पष्ट करण्यात आला. यानंतर मशाल रॅली काढण्यात आली.एनसीसी चे सर्व विद्यार्थी यात सहभागी होते . भारत माता की जय, वंदे मातरम, “एक देश एक नारा, अखंड हो भारत हमारा” या घोषणांनी मशाल रॅली संपन्न झाली. कृष्णकांत चौक ते शिवाजी चौक या दरम्यान रॅली काढण्यात आली.
कार्यक्रम प्रमुख संतोष कोले, एनसीसी प्रमुख विष्णू तेलंग, अभ्यास पूरक मंडळ प्रमुख बालाजी पडलवार, मीनाक्षी कस्तुरे ,प्रीती शेंडे ,गुरुदत्त महामुनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
कार्यक्रमाची सांगता संकुलाच्या प्रांगणात वंदे मातरम ने झाली.

About The Author