आजचा विद्यार्थी भविष्यातील समृद्ध भारताचा भक्कम आधारस्तंभ – राहुल केंद्रे

आजचा विद्यार्थी भविष्यातील समृद्ध भारताचा भक्कम आधारस्तंभ - राहुल केंद्रे

उदगीर(एल.पी.उगीले) : आजादी का अमृत महोत्सव समारोप वर्षानिमित्त श्यामलाल मेमोरियल हायस्कूलच्या प्रांगणात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल केंद्रे यांच्या शुभ हस्ते राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न झाले. आजादी का अमृत महोत्सव व स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी बिरादार शुभम, पवार हर्षद, देवणे श्रुती, सुमित शिंदे या विद्यार्थ्यांनी प्रभावीरीत्या भाषण केले त्याचबरोबर देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.

प्रमुख अतिथी राहुल केंद्रे यांनी सांगितले की, आजादी का अमृत महोत्सव समारोप वर्षानिमित्त विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केंद्र व राज्य शासनातर्फे वेळोवेळी आयोजित केले जात आहे. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही अतिशय चांगली बाब आहे, शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, देश प्रेम, देश निष्ठा, समाजसेवा चांगल्या प्रकारे रुजावी. यासाठी शासनाकडून अशा विविध देशभक्तीपर उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी, विकासासाठी, समृद्धीसाठी ज्या ज्या वीर पुरुषांनी आपले जीवन समर्पित केले, त्याबद्दल कृतज्ञतेची भावना सर्वांच्या मनात जागृत राहावी, देशाच्या प्रगतीसाठी आपला हातभार कसा लागेल, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, संस्थेतर्फे आयोजित विविध नाविन्यपूर्ण उपक्रमात विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग घ्यावा, आपल्या सुप्त कलागुणांचा विकास करावा, आजचा विद्यार्थी भविष्यातील समृद्ध भारताचा भक्कम असा आधारस्तंभ बनावा. यासाठी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण घ्यावे, “विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पहा, त्यासाठी खूप मेहनत करा, तुमची मेहनत तुमचे स्वप्न साकार करतीलच. “यासंबंधी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापक आनंद चोबळे, प्र. उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण, प्र. पर्यवेक्षक राहुल लिमये, ज्येष्ठ शिक्षक देबडवार संजय,नारायण कांबळे,प्रा. सपाटे ज्ञानेश्वर, प्रा. गोखले वसंत, प्रा. खंदारे भारत, धनश्री जाधव,रोडगे शैलजा, ऐतनबोने शीलन इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रा. घोगरे संग्राम यांनी केले.

About The Author