आ.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते १ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या निधीतून रस्ते विकासकामाचे भूमिपूजन !

आ.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते १ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या निधीतून रस्ते विकासकामाचे भूमिपूजन !

अहमदपूर( गोविंद काळे ) तालुक्यातील अंधोरी येथे (गंगाखेड जिल्हा सरहद ते अंधोरी प्रजिमा) रस्ता काँक्रीटीकरण, डांबरीकरण, रुंदीकरण व पूल मोऱ्यांचे बांधकाम कामाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ.बाबासाहेब पाटील यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत रस्ता विकासकामाचे भूमिपूजन केले. सुमारे १ कोटी ५७ लक्ष रुपयांच्या निधीतून हे काम हाती घेण्यात आले आहे.

मतदारसंघात रस्ते विकासाचे काम उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. दळणवळणाची सुविधा सोयीस्कर होण्याच्या दृष्टीने रस्ते हे महत्त्वाचे असतात. रस्ते मजबुतीकरणाबरोबरच मतदारसंघात आवश्यक असणाऱ्या ठिकाणी रस्त्याचे काम केले आहे. आगामी काळात आवश्यक असलेल्या ठिकाणी रस्ते मंजूर करून ते काम हाती घेण्यात येईल, असे मत आ.बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष चेअरमन बापूरावजी सारोळे, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद तात्या हेंगणे, माजी चेअरमन उत्तमरावजी देशमुख, गोपीनाथराव जोंधळे, तानाजी राजे, सरपंच प्रफुलाताई ब्रिंगने, राजकुमार गायकवाड, कल्याणी आप्पा, कंत्राटदार राम लव्हारे, अभियंता भोसले साहेब, उपसरपंच शिवप्रकाश गुंडरे, सतीश शिरसागर, विश्वनाथ मुंडे, शिवाजीराव पाटील, दत्ताराव शिंगडे, बापू पाटील, राजपाल पाटील, किरण पाटील, धनंजय उजनकर सर, अविनाश देशमुख, लक्ष्मणराव घोडक, सौ.उषाताई सूर्यवंशी ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author