किलबिल मध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा…!!
अहमदपूर ( गोविंद काळे) : शहरातील किलबिल नॅशनल स्कूल शाळेमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा स्वातंत्र्य दिन व अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सांगता कार्यक्रम अगदी उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने शाळेमध्ये ध्वजारोहण व विविध कला गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शहरातील सुप्रसिद्ध भूलतज्ञ तथा महाराष्ट्र शासनाचे वर्ग 1 चे अधिकारी डॉ.धीरज देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच विविध कला गुणदर्शन कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले तर प्रमुख अतिथी म्हणून शहरातील नामवंत डॉक्टर्स सुप्रसिद्ध भूलतज्ञ डॉ.धीरज देशमुख, हृदयरोग तज्ञ डॉ. ऋषिकेश पाटील, अस्थिरोग तज्ञ डॉ. सुनील चलवदे, रेडिओलॉजिस्ट डॉ. महेश पलमटे, नेत्ररोग तज्ञ डॉ. रामेश्वर चामले, बालरोग तज्ञ डॉ. नरेंद्र जवणे,जनरल फिजिशियन डॉ. रामदास होळकर शहरातील सुप्रसिद्ध स्ट्रेंथ जिम लॅब चे संचालक मनोज कुलकर्णी, वेट लिफ्टिंगचे मास्टर ट्रेनर शिवानंद स्वामी हे या प्रसंगी उपस्थित होते.
शाळेतील बालचिमुकल्यांनी विविध कला गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये भाषण, गीत गायन,कराटे, नॉनचॉक डेमो, अरेबिक डेमो चे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकाराची माहिती व्हावी म्हणून शहरातील स्ट्रेंथ जीम लॅबच्या वतीने वेट लिफ्टिंग व पावर लिफ्टिंग या क्रीडा प्रकाराचे काही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
सदरील कार्यक्रमांमध्ये नुकत्याच भंडारा येथे झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये ब्राँझ मेडल प्राप्त केलेली शाळेची राष्ट्रीय खेळाडू कु. जान्हवी गणपतराव जाधव व इंटरनॅशनल मॅथ ओलंपियाडमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलेले गुणवंत विद्यार्थी प्रणव धोंडीराम पाटील, विवान गजानन कमठाणे, तेजस मंगेश रणखांब या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सचिन जगताप यांनी केले. आभार Co-ordinator समरीन शेख यांनी मानले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.