आम्ही गावकरी ऐक आहोत हे सागणाच काम गावची वेस करते- राहुल केंद्रे

आम्ही गावकरी ऐक आहोत हे सागणाच काम गावची वेस करते- राहुल केंद्रे

उदगीर (प्रतिनिधी) आम्ही गावकरी ऐक आहोत हे सांगण्याचे काम गावची वेस करते, असे विचार बनशेळकी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या वेसच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले.
‌या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच विकास (नरसिंग) शेळके हे होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक उदगीर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अमोल निडवदे, युवा उद्योजक आशिष अबंरखाने, डॉ.विजय बिरादार, डॉ.सुनिल बनशेळकीकर, गुरुनाथ पाटील, कपील बनशेळकीकर, भाजपचे शहर उपाध्यक्ष अमर सुर्यवंशी , कपील शेटकार,
‌ई. उपस्थित होते.
‌यावेळी बांधण्यात आलेल्या वेसी चे उद्घाटन सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांच्या व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
‌या वेळी मुन्ना पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हटले कि, ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधी मदत न घेता ऐतिहासिक वेस बांधुन आमच्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. या कामी गावकऱ्यांच व ग्रामपंचायतच कौतुक केलं तेवढं कमी आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच विकास शेळके यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बनशेळकीचे सामाजिक कार्यकर्ते नागेश आंबेगावे यांनी तर आभार उमाकांत श्रीडोळे यांनी केले.या कार्यक्रमाला चेअरमन प्रल्हाद महाजन, उपसरपंच विवेक महाजन कार्यक्रमाचे संयोजक मनोहर गटोडे, रोहिदास लोहारे, गुरुनाथ आंबेगावे, महादेव पाटील, अबुहुजैब शेख, शिवाजी कांबळे, राजेश्वर आंबेगावे,बाळु चव्हाण, गुरुनाथ पाटील,सतीश मचकुरे,संगम महाजन, उमाकांत सुर्यवंशी,अविनाश आवाळे, महादेव बिरादार, उमाकांत श्रीमडळे, बालाजी जमादार, अंबादास चिखलचांदे,
रायपा आंबेगावे, उमाकांत लोहारे,अंतेशवर पटवारी, मनोज गवरे, महादेव हाडोळे, नामदेव सावळे,किशन मचकुरे, शिवलिंग आंबेगावे, श्याम पाटील,यांच्यासह विविध विकास सोसायटीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट……….
विकासकामांसाठी राजकारण बाजूला सारून मदत करणार – मुन्ना पाटील
व्यासपीठावर बसलेले आम्ही जरी वेगळ्या पक्षात जरी असलो गावच्या विकासासाठी राजकारण बाजूला सारून आम्ही मदत करु असे मत बनशेळकी येथे वेसीच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून बोलत‌ होते.महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून गावाच्या विकासासाठी निधी खेचून गावच्या विकासाला हातभार लावणार व त्याचबरोबर गावकऱ्यांनी वेस बांधकामासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधी मदत न बांधकाम केल्याबद्दल मुन्ना पाटील यांनी गावकऱ्यांचे व ग्रामपंचायतचे कौतुक केले.

About The Author