खडके क्रिटिकल केअर सेंटरच्या वतीने शहरात जनजागरण फेरीचे आयोजन

0
खडके क्रिटिकल केअर सेंटरच्या वतीने शहरात जनजागरण फेरीचे आयोजन

खडके क्रिटिकल केअर सेंटरच्या वतीने शहरात जनजागरण फेरीचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : उच्च रक्त दाब दिनानिमित्त येथील खडके क्रिटिकल केअर सेंटरच्या वतीने शहरात जनजागरण फेरीचे आयोजन करण्यात आले. जागतिक उच्च दाब दिवस जगभरात हा 17 मे रोजी साजरा करण्यात येत असून त्या अनुषंगाने उच्च रक्तदाबाबद्दलचे बरेच गैरसमज सर्वसामान्यांना माहीत व्हावे या हेतूने रविवारी (ता.26) शहरात काढण्यात आलेल्या जनजागरण फेरीच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.अतुल खडके, डॉ. चंद्रकांत उगिले यांची उपस्थिती होती. उच्च रक्तदाब ( हायपरटेन्शन) हा हृदय विकाराचा झटका, हृदय बंद पडणे, हृदयाला धक्का बसणे, मूत्रपिंड रोग, पायातील धमन्यांमध्ये ब्लॉकेज व गँगरीन यासाठी धोका उद्भवणारा आहे. सध्या स्थितीला युवा वर्गातही हायपरटेन्शनने ग्रस्त झालेली संख्या अधिक होत असल्याचे सांगण्यात येते. हायपर टेन्शन हा सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. 50% पेक्षा जास्त रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे न जाणवता बऱ्याच वर्षापासून उच्च रक्तदाब असतो. तो शरीराच्या महत्वपूर्ण अवयवांमधील रक्तवाहिन्याला हानी पोहोचवत असतो.काहींना रुग्णांना हायपर टेन्शनमुळे डोकेदुखी, हृदयाचे ठोके कमी जास्त होणे, छातीत दुखणे, स्वच्छोश्वासास त्रास यासारख्या लक्षणाचा अनुभव येऊ शकतो. उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी आपल्या आहारामध्ये मिठाचे सेवन कमी करावे. स्निग्ध पदार्थ टाळावीत मांसाहार टाळावा तर उच्च रक्तदाबापासून दूर राहण्यासाठी योगसाधना तसेच व्यायाम करावा व तणाव मुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला आरोग्य तज्ञाच्या वतीने सांगण्यात येत आहे. दोन किलोमीटर अंतराच्या काढण्यात आलेल्या या जनजागरण फेरीमध्ये जवळपास 100 नागरिकांनी उच्च रक्तदाब टाळण्यासाठीचे संदेश असलेले फलक घेऊन घोषणा दिल्या. यावेळी डाॅ.खडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

नागरिकांच्या सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये आरोग्याकडे आरोग्याकडे दुर्लक्ष होत चालले असून माणसाचा ताणतणाव वाढत आहे. या ताणतणावामुळे उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असून शरीरातील बऱ्याच अवयवास यापासून हानी होण्याची शक्यता असते. वय वर्ष 18 पुढील व्यक्तींना रक्तदाब होण्याची शक्यता असून काही वेळेस त्याची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत नागरिकांनी तज्ञाकडून वेळोवेळी उच्च रक्तदाब तपासून घ्यावा. उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यास नियमित व वेळेवर तज्ञाचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावा.त्यात खंड पाडू नये अन्यथा धोका होण्याची शक्यता असते.

डाॅ.अतूल खडके, हृदयरोग तज्ञ, अहमदपूर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *