चाकूर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या उदगीर शाखेत दिनदर्शिकेचे प्रकाशन
उदगीर (एल पी उगिले)चाकूर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., लातूर या संस्थेचे अध्यक्ष युनूस मासुलदार यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २६ डिसेंबर...
बी.एस्सी. तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात
बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड. लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे. सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते. तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Vegasino Casino: Exploring the Thrills of Online Gaming with Convenience
Experience the Thrill of HeroSpin Casino: A World of Endless Entertainment
Online baccarat in New York: Digital evolution of a classic card game
उदगीर (एल पी उगिले)चाकूर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., लातूर या संस्थेचे अध्यक्ष युनूस मासुलदार यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २६ डिसेंबर...
उदगीर (एल पी उगीले) साने गुरुजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संत तुकाराम लॉ कॉलेज उदगीर व राजीव गांधी नर्सिंग कॉलेज...
उदगीर (एल पी उगीले): उदगीरकरांनी मोठा विश्वास टाकत आपल्याला नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून, या संधीचे सोने...
उदगीर (एल पी उगीले) येथील गोल्डन गेट पब्लिक स्कूलशाळेत ख्रिसमस डे अतिशय उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या...
लातूर (एल पी उगिले)"शासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा केवळ सोय नसून, भ्रष्टाचार रोखण्यासाठीचे ते एक उत्तम हत्यार...
उदगीर (एल पी उगीले) ,येथील मातृभूमी महाविद्यालय कस्तुराबाई नर्सिंग स्कूल मातृभूमी नर्सिंग स्कूल च्या वतीने जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त जनजागृती...
उदगीर (एल पी उगिले) शेती व शेतकरी हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी माजी पंतप्रधान स्व. चौधरी...
उदगीर (एल पी उगिले)छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात वीर बालदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष गुंडेराव...
उदगीर (एल पी उगिले)फक्त पाठांतर नव्हे तर विज्ञानातील प्रयोगशीलता, निरीक्षणशक्ती आणि तार्किक विचारांना प्राधान्य देणाऱ्या शिक्षणपद्धतीचे फलित म्हणजे डॉ. होमी...
लातूर (प्रतिनिधी) : शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते, पाणी व नाल्यांची सुविधा करून नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम झालेले आहे. निराधारांच्या...